
पहिल्या पत्नी सोबत पटत नाही म्हणून दुसरं लग्न केलेल्या 55 वर्षीय शिक्षकाने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले परंतु पहिल्या पत्नीने या विरोधात केस दाखल केल्यानंतर पहिल्या पत्नीला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिन्याला आठ हजार रुपये देण्याचे आदेश दिले .त्यानंतर देखील पहिल्या पत्नीने पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली .तडजोडीसाठी पहिली पत्नी व मुलाने प्रयत्न केले परंतु उमरे यांनी ते नाकारले .त्याचाच राग धरत वरोरा तालुक्यातील मारडा या गावाच्या जवळ शेत शिवारात मित्राच्या सहाय्याने दगड व चाकूने वार करत गंभीर जखमी केले.मुलाच्या व मुलाच्या मित्राच्या विरोधात वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .जखमी उमरे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.
