

मागील सहा वर्षात वरोरा तालुक्यात दारूचा महापूर वाहत आहे.आजवर वरोरा पोलीस ठाण्यात शेकडो गुन्ह्यांची नोंद झाली ,कित्येक वाहने जप्त झाली परंतु दारू तस्करी काही बंद होण्याचे नाव घेत नाही.
वरोरा शहरातील स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच ही अवैध दारू तस्करी होत असल्याचे कित्येकदा पुढे आले.वरोरा तालुक्यात दारू तस्करांचं जाळ पसरून आहे .सर्वसामान्यांना विना परवाना कुठेही जाता येत नाही पण दारू मात्र नागपूर,यवतमाळ तसेच हिंगणघाट या भागातून बिनदिक्कत जिल्ह्यात येऊन अवैधरित्या विकल्या जातेच कशी हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.
एकीकडे जिल्हाबंदी असताना जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी केली जात असूनही दारुतस्करांचे वाहन जिल्ह्यात येऊन दारूच्या पेट्याच्या पेट्याची तस्करी करीत असल्याने सीमेवर तपासणी वर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.एकंदरीत काय तर प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच आशीर्वादाने हे घडत आहे हे काही विशेष सांगायला नको.इथे सर्व आलबेल असल्याने एखाद्याने तक्रार केली तरी तुझ्याविरुद्ध या इसमाने तक्रार केली असे सांगणारे देखील कर्मचारी आहेत ,असा अनुभव मनसे चे तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांनी सांगितला.जर कुंपनच शेत खात असेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवावी असा सवाल देखील त्यांनी एकंदरीत व्यवस्थेवर उचलला आहे.
