


प्रतिनिधी:राहुल झाडे
वरोरा तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू आहे.त्यामुळे ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने वाहने चालवीत असतात.आज वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड येथील वळणावर भर धाव येणाऱ्या ट्रॅक्टर ने दोन युवकांना चिरडले. एक युवक गंभीर असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व एका युवकाला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टर खाली दुचाकी अडकली व युवकाचा पाय देखील ट्रॅक्टर च्या चाकात गेला .घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे युवकाच्या पायावर चढलेला ट्रॅक्टर पुढे घेण्यात आला.अपघातग्रस्त दुचाकी चा क्र. MH31CZ3111 हा आहे.
ट्रॅक्टर क्र. MP34 AA4690 हा असून ट्राली वर दिलीप घोरपडे असे लिहून असल्याने हे ट्रॅक्टर भा ज पा चे विद्यमान नगरसेवक यांचेच असल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रॅक्टर व दुचाकी वाहन जप्त केले आहे.पुढील तपास सुरू आहे.या अवैधरित्या होणाऱ्या रेतीतस्करी मुळे पुन्हा एकदा सामान्याचा जीव धोक्यात आला असून तस्करीवर आला घालणे अधिक गरजेचे झाले आहे.
