वरोरा शहरातील युवक मिळून स्वतः वॉर्डात करत आहे निर्जंतुकीकरण फवारणी

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहेत.वरोरा शहरातील काही युवक मित्रमंडळी मिळून स्वतःचा वॉर्ड सॅनिटाईझ करण्याचे ठरवले .वरोरा शहरातील सुभाष वॉर्ड येथील प्रवीण चिमुरकर,अमितसिंग ठाकूर,विजय जुनघरे,राजू पोलशेट्टीवार, आणि अन्य मित्रांनी मिळून स्वतःच्या संपूर्ण वॉर्डला सॅनिटाईज करण्यास सुरुवात केली आहे.सुरुवात ही स्वतः पासून केली पाहिजे याच म्हणीचा आदर्श घेत मित्रमंडळी मिळून वॉर्डात फवारणी करीत आहे .संपूर्ण वॉर्डात एकूण 5 फवारणी पंप सुरू आहेत .जे काम नगर परिषदेकडून व्हायला पाहिजे तेच काम या युवकांनी करून आदर्श काम हाती घेतल आहे