
दि. २६ फेब्रुवारी २०२२ ला लोकमान्य विद्यालय वरोरा येथे ” मिशन गरुडझेप व एस एस सी / एच एस सी परीक्षापूर्व कार्यशाळेचे आयोजन सकाळी १०-३० वाजता लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास कावलकर यांच्या अध्यक्षतेखाली व डाॕ प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी पं. स. वरोरा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले . या वेळी डाॕ प्रकाश यांच्या सूचनेनुसार वरोरा तालुक्यातील जि. प. शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षक उपस्थित होते . मागील वर्षीपासून तर आजपर्यंत अजूनही आपण कोव्हीड मधून पूरते सावरलेलो नाही . त्यामुळे प्रशासनाने ईयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षा आॕफलाईन घेत असतांना ज्या शाळेचे विद्यार्थी त्याच शाळेत परीक्षा देतील असा निर्णय घेतला आहे . यामुळे निश्चितच परीक्षा केंद्रांची संख्या वाढली व जास्त प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासली . या वर्षी बोर्डाने या परीक्षांसाठी लागणारे मनुष्यबळ जि. प. च्या पदवीधर शिक्षकांची मदत घेवून पूर्ण करण्याचे लक्ष ठेवलेले आहे . हे मनुष्यबळ निवडणुकीपासुन तर अशा परीक्षांच्या आयोजना पर्यंत प्रत्येक काम व्यवस्थित करीत आलेले आहेत आणि ही जबाबदारी ते प्रामाणिकपणे सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . अध्यक्षीय प्रबोधनात कावलकर यांनी शिक्षक हा समाजातील असा एक घटक आहे की जो शासनाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट स्विकारतो आणि पुढे जातो . निश्चितच या परीक्षां संदर्भात आपल्याकडे जी जबाबदारी सोपविण्यात येईल ती आपण निश्चितपणे पार पाडाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .*
*कार्यक्रमाचे सूत्र चंद्कांत पेटकर यांनी तर प्रास्ताविक संजय काळे विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले . तालुक्यातील जि. प. शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षक यावेळी उपस्थित होते .*
