
सदभावना युवा एकता , सदभावना चौक , वरोरा च्या वतीने आयोजित गांधी जयंतीचे व जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून ” सदभावना चौक ” या नविन फलकाचा अनावरण सोहळा आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते व मा. ऐहतेशाम अली अध्यक्ष नगर परिषद वरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . १९९४ साली स्थापन झालेल्या या चौकात सदभावना एकता मंचाने आजपर्यंत अनेक विधायक कार्यक्रम घेतल्याचे प्रतिभाताईंनी आपल्या प्रबोधनात सांगितले . त्या पुढे म्हणाल्या की सदभावना या नावातच सर्वधर्म समभाव भरलेला आहे ज्याची आज ख-या अर्थाने देशाला गरज आहे . सदभावना एकता मंचाने परत पुन्हा चांगले विधायक कार्य घडवून आणावे मी क्षेत्राची आमदार म्हणून सदैव आपल्या पाठिशी असेन असे आश्वासन दिले . मा. एहतेशाम अली यांनी ही अनावरणाचे वेळी सदभावना सदस्यांनी आजच आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीरा च्या आयोजना ची मुक्त कंठाने प्रशंसा केली . मी नेहमीच अशा विधायक कामांसाठी आपल्या सोबत असेन असेही ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे आयोजक छोटूभाई शेख , गोपाळ गुडधे , अरुण उमरे , राजकुमार गिमेकर , आसेकर सर , मिनाज अली , गुरुदेव जुमडे व सदभावना युवा एकता च्या शेकडो सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले .
