
ढाणकी प्रतिनिधी (प्रवीण जोशी)
शहरातील गणेश मंडळ पदाधिकारी यांनी आगामी सण उत्सवांदरम्यान नगरपंचायतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निवेदन नगरपंचायत अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या कडे दिले
ढाणकी येथील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उत्सवा दरम्यान विविध समस्या व मागण्यांसाठी हे निवेदन मध्ये येत्या गणेशोत्सवा दरम्यान पुढील् मागण्या/ समस्या आपण सोडवाव्यात निवडलेल्या प्रदक्षिणा / मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे व रस्ता समतल करणे.मिरवणूक मार्गाविरील पथदिव्यांची व्यवस्था करणे.विसर्जन घाटावर लाइट की सोय करणे,
गणपती मिरवणुकी दरम्यान व विसर्जन घाटावर रुग्ण वाहिका उपलब्ध करून देणे: मिरवणूक मागविरिल वाटेत येणाऱ्या वृशांच्या फांद्या झाटणे
बीएसएनएल चे बंद असलेले खांब यांची व्यवस्था लावणे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करणे. या मागण्या नगरपंचायत कडे करण्यात आल्या यावेळी शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते सण उत्साही गणेश मंडळ, शिवगर्जना गणेश मंडळ , युवाशक्ती गणेश मंडळ, जगदब गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ, हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ, शिव साम्राज्य गणेश मंडळ.
रामराज्य गणेश मंडळ , बजरंगी गणेश मंडळ, महाकाल गणेश मंडळ, शिव शंभु गणेश मंडळ मेहरू युवक गणेश मंडळ,
शिव गणेश मंडळ इत्यादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
