चाचोरा वासीयांच्या नशिबी मरणानंतरही यातनाच, स्मशानभूमी नसल्याने नाल्याच्या काठावर अंत्यसंस्कार

पुराने अस्थी गेल्या वाहून

राळेगाव ता प्रतिनिधी
रामभाऊ भोयर

खरा 

गावातील भारत हा गावात वसतो अशा कितीही फुशारक्या मारल्या जात असल्या तरी अशा या गावात सुवीधे बाबत मात्र वाणवा असते याचे प्रत्यय वारंवार येतं असते. राळेगाव तालुक्यातील चाचोरा गावातही याचा प्रत्यय आला. एका 23 वर्षीय तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. गावात स्म्शान नसल्याने नाल्या लगत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी नाल्याला पूर आला अन तिच्या अस्थी वाहून गेल्या. ही दुर्देवी घटना 10 सप्टेंबर रोजी घडली.
वडकी परीसरात येणाऱ्या चाचोरा भाग्यश्री रायबान मोहूर्ले वय २३ या मुलीचा गावालगत विहरीत पाणी भरत असताना तोल जाऊन विहरीत पडून मृत्यू झाला हि घटना शनिवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली त्यानंतर त्याच दिवशी तीचा अंतिम संस्कार करण्यात आला या गावात मशानभूमी नसल्याने गावालगत च्या नाल्याच्या काठावर अंतिम संस्कार करण्यात येतो प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी लाकड शिरवने व अस्थी गोळा करण्याचे होते मात्र दुसऱ्या दिवशी (रविवार) सकाळपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली व नदी नाल्याना पूर आले मोहूर्ले कुटुंब लाकड शिरवन्यासाठी गेले असता नाल्याच्या पुराने भाग्यश्रीच्या लाकड व अस्थी पुर्नता वाहून गेल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांना अस्थी न घेताच परत यावे लागले ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईने भाग्यश्री चा मृत्यू झाला तर मशानभूमी नसल्याने तिच्या अस्थी सुध्दा पुराने वाहून गेल्या हि दुर्दैवी घटना चाचोरा गावात घडली पाणी प्रश्न मिटवा व मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे