तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावा वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी…..

विविध समस्यांनी ग्रासलेल्या उमरखेड तालुक्यातील प्रश्न तत्काळ मार्गी लावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने 23 सप्टेंबर रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे आले असता त्यांना निवेदन द्वारे केली,
वंचित बहुजन आघडीचे जिल्हा प्रमुख धनंजय गायकवाड,जिल्हा महासचिव जॉन्टी तथा प्रशांत विणकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुका प्रमुख संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील प्रामुख्याने ई वर्ग सरकारमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना नियमकुल करणे व त्यांची गाव नमुना आठला नोंद करणे, गाव तिथे स्मशान भूमी या प्रस्तावाला मंजुरी देऊन, स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून दहन शेड साठी निधी मंजूर करणे, तालुक्यातील पांदन रस्त्याचे अतिक्रण हटवून रस्ते पूर्वरत करणे, घरकुल लाभार्थी यांच्यासाठी रेती घाट आरक्षित करून त्यांना रेती पुरवणे,
उमरखेड तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या तत्काळ मार्गी लावून आरोग्य सेवा पुनर्जीवित करणे,
तालुक्यातील ना दुरुस्त रस्त्याचे दुरुस्तीचे काम करणे, जंगल विकास व पाणलोट विकास करणे,जॉब कार्ड धारकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणे, दलीत सुधार योजनेचा निधी त्याच कामासाठी वापरून तो इतरत्र कुठेही वळता न होऊ देणे,
महिला सक्षमकरणासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज योजना मजूर करण्यासाठी बँकांना आदेश देणे, या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले या वेळी वंचित बहुजन आघाडी चे देवानंद पाईकराव, संभाजी मुनेश्र्वर ,विनोद बर्डे,विष्णू वाडेकर, सुधाकर कदम, सिद्धार्थ धोंगडे,युसुफ खान,राजाराम काकडे, धम्मदिप काळबांडे,हरिभाऊ नरवाडे,स्वप्नील ढोले, विनोद सुमेध खंदारे, मरिबा गायकवाड ,यशवंत धोंगडे, संदीप कदम ,लक्ष्मण सावते,सिद्धार्थ पाईकराव ,यशवंत काळबांडे, गजानन धोंगडे,नागोराव धुळे, उपस्थित होते