
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
–
आज क्रांतीविर शामादादा कोलाम जयंती पर्व साजरी करुण सर्व समाज बांधवाना सामाजिक एकता दिवस सावंगी ( पेरका ) साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी गावात भव्य मिरवणुक काढण्यात आली आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितत गोंडवाना गणतंत्र पार्टी शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.सर्व समाज संगठित व्हावा,गावागावात सामाजिक एकता निर्माण व्हावी यासाठी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष मा विठ्ठल दादा धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा विजया रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) मा ज्ञानेश्वर कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष मा राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष मा ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष मा हर्षल आडे जिल्हा संघटक जयश्री मेश्राम राहुल वाढवे यांच्या उपस्थितीत गोंडवाना गणतंत्र पार्टी शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.गोंडवाना गणतंत्र पार्टी पक्ष बांधनी करण्यासाठी मा वर्षां ताई आडे तालुका अध्यक्ष राळेगाव यांच्या पुढाकाराने समाज जागृती अभियान निर्माण होताना दिसतोय ही आदिवासी समाजात गौरवाची बाब आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहीले पाहिजे असे मत मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आडे यांनी केले या कार्यक्रमात तालुका सचिव म्हणून समिर कुमरे तालुका संघटक म्हणून गजानन कुमरे आणि शाखा प्रमुख म्हणून कैलास कुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंकज तोडासे विशाल परचाके प्रदिप मडावी बाबाराव पंधरे कविता कन्नाके कौसल्या पंधरे मनिषा पुसनाके जिजा पंधरे नर्मदा वाढेकर राहुल वाढवे राजुभाउ केराम विनोद पराते आणि सर्व समाज बांधव सहभागी झाले होते.
