
(तालुक्यातील अवैध रेती हर्रास करून घरकुलाच्या कामासाठी मोफत उपलब्ध करून देण्यासह विविध मागण्यांचे मनसेचे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाच्या कामासह विविध विकास कामे चालु असुन याकामांवर परप्रांतीय मजुर काम करीत आहेत त्यामुळे या कामांवर स्थानिक मजुरांना प्राधान्य देवुन रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच तालुक्यातील रखडलेल्या घरकुलाच्या कामासाठी शासन स्तरावरून मोफत रेती उपलब्ध करून द्यावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून राळेगाव तालुक्यात एकाच रॉयल्टीवर ओव्हरलोड अवैध रेती वाहतूक सुरु आहे, हर्रास न झालेल्या घाटावरून, नाल्यावरून तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्यात येतो. या बाबत कडक कारवाई करण्यात यावी, हि अवैध रेती शासकीय कामांवर आणि बेमळाच्या कामावर पडलेली आहे त्यावर कडक कारवाई करुन ती अवैध्य रेती जप्त करण्यात यावी.
सोबतच खैरी गावातून भरधाव रेती चे टिप्पर धावतात या ठिकाणी महसूल विभागाची चौकी असणे अत्यावश्य्क आहे. तालुका अती दुर्गम भाग असल्याने आधीच इथे तरुणांना, मजूरांना रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे इथे सुरू असलेल्या शासकीय कामांवर, रोडच्या कामांवर, बेंबळाच्या कामावर स्थानिक युवकांना, मंजूरांना काम देण्यात यावे.
तालुक्यामध्ये शासनातर्फे गरीब कुटुंब, शेतकऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर झाली असून, घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे [१५०००] हजार रुपये रक्कम जवळपास प्रत्येक घरकुलधारकांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे.
तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, राळेगाव तालुक्यामध्ये सध्या कुठलाच रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळून राहिली नाही, तसेच घरकुलधारकांसाठी घरकुल बांधकाम सुरू करणे खूप मोठी डोकं दुःखीच होत आहे त्यामुळे घरकुल धारकांच्या रखडलेल्या बांधकामासाठी शासना मार्फत आपल्या स्तरावर घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, वा.ता.अध्यक्ष आरिफ शेख, उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, शहराध्यक्ष प्रतिक खिरटकर, उपाध्यक्ष सागर पोटफोडे, स्वप्निल नेहारे, विठ्ठल शेंडे, निलेश पिंपरे, बंडू भारसाखरे सह पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
