ढाणकी येथील भारतीय स्टेट बँकेत खातेदाराची पन्नास हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास

ढाणकी प्रतिनिध प्रवीण जोशी


दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान उत्तम भीमराव गोधावळे यांनी आपल्या खात्यातून पन्नास हजार रुपयाची रक्कम काढली व ती रक्कम अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना, भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीमध्ये घडली आहे त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, उत्तम गोधावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी तीन च्या दरम्यान गोधावळे यांनी खत बियाणे आणण्यासाठी घरी पैसे नसल्याने भारतीय स्टेट बँके शाखा ढाणकी मध्ये स्वतःच्या खात्यातून चेक द्वारे 50 हजार रुपये रक्कम काढली व स्वतःच्या थैलीमध्ये पैसे ठेवले व फिक्स डिपॉझिट ची चौकशी करण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना फिक्स डिपॉझिट ची विचारपूस केली व फॉर्म व जवळची थैली घेऊन उत्तम गोधावळे महावितरण 33kv उप केंद्र बिटरगाव मध्ये कार्यरत असल्यामुळे ते ड्युटीवर बिटरगाव येथे गेले तेव्हा त्यांनी थैली तपासून पाहिली असता त्यांच्या थैलीत बँकेतून काढलेली पन्नास हजार रुपयाची रक्कम दिसत नसल्याने ते ढाणकी येथील स्टेट बँक मध्ये परत आले व बँकेत चौकशी केली परंतु पैसे भेटले नसल्याने त्यांच्या नायलॉनच्या थैल्यातील ठेवलेले 50 हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे त्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले त्यानुसार बिटरगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाच्या नावाने भारतीय दंड संहिता 1860 नुसार, कलम 379 चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पुढील तपस बिटरगाव पोलीस ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, बीट जमदार मोहन चाटे व भालेराव करत आहे