ऐश्वर्या वाढोणकर हिने केले चारदा रक्तदान

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा काॅंग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते अरविंद वाढोणकर यांची कन्या अश्वर्या वाढोणकर हिने वयाच्या एकविस वर्षांपर्यंत चारदा रक्तदान केले असून रक्तदान आज हे अतिशय महत्वाचा घटक झाला असला तरी पण तरूणीमध्ये रक्तदान करण्याचे प्रमाण फार अल्प असतांना सुद्धा अश्वर्याने दाखविलेले धाडस हे तरूणीसाठी एक चांगला पायंडा असून अश्वर्या ही पुणे येथे ईंजिनियरींग करत असून काॅंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर व लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगावचच्या महाविद्यालयीन शिक्षिका वंदना वाढोणकर यांची कन्या असून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी केलेल्या रक्तदानाबाबत ग्रामीण भागात सर्वत्र कौतुक होत आहे.