
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे व तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे, शिफ्ट इचार्ज अरुण कामनापुरे, जेष्ठ शिक्षिका साधना येरेकार , प्रमुख वक्ते विनोद तायडे यावेळी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर महाराष्ट्रातचे राज्यगीत यावेळी गाण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु वैशाली चौधरी यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच यावेळी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी,मान्यवरांनी व प्रमुख वक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील वर्ग 10 वी च्या सर्व विध्यार्थीना भावस्पर्शी निरोप देण्यात येऊन एस. एस. सी. च्या बोर्ड परीक्षे करिता योग्य असे मार्गदर्शन करून परीक्षेकरिता सूचना देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेखा कुमरे यांनी केले. व आभारप्रदर्शन कु. निलिमा गोंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेतील शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
