पवनार बस स्थानक चौक बनतोय कर्दनकाळ
प्रशासन गाढ झोपेत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वर्धा नागपूर हायवेवरील पवनार बस स्थानक चौक दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे महिन्यकाठी किमान चार ते पाच अपघात होत असून या ठिकाणी गतिरोधक अथवा पुलाची निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन निगम या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांन कडून चांगलाच रोष्य व्यक्त होत आहे.
नागपूर बुटीबोरी तुळजापूर महामार्ग क्रमांक 353 आय हा हायवे असल्याने वाहने सुसाट वेगाने दिवस रात्र धावत राहतात
त्यातच वळण रस्ता असल्याने दूर वरील वाहने दिसून पडत नाही त्या मुळे रोडच्या दोन्ही बाजूला गावाची निर्मिती झाली असता रोड क्रॉस करताना नागरिकांना जीव मुठीत घेवून रोड क्रॉस करावा लागत आहे.
महिण्यकाठी रोड क्रॉस करताना चार ते पाच घटना घडत आहे त्या पैकी आता पर्यंत या चौकात अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागल्याचाय धकादायक घटना या चौकात घडल्या असल्याने
मागील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी घटना घडत असलेल्या जागेची पाहणी करून ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले व त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र अद्यापही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलेही ठोस पावले उचलल्या गेली नाही.
परिणामी अजून किती नागरिकांना आपला जीव गमवावा लागेल असा तीव्र संताप व्यक्त करत शासनावर रोष व्यक केला जात आहे.
बुधवार रोज 8/1/25/ रोजी सेलू कडून वर्धा कडे जाणाऱ्या मोपेट स्कूटर MH 32 AW 9701 क्रमांकाच्या गाडीला भरधाव वेगाने जात असलेल्या होंडा गाडीने जबर धडक दिली त्यामुळे गाडी रोडवर आदळली असल्याने यात घोराड येथील एक युवक मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला होता.
मात्र नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असल्याने त्या तरुण युवकाचे प्राण वाचले पवनार हे गाव दोन विभागात तयार झाले असून जुनी वस्ती रोड पलीकडे जुनी व बस स्थानकाजवळ नवीन कॉलनी तयार झाली असल्याने दोन्ही वस्त्यांच्या मधात रोड आहे त्या मुळे ग्रामस्थांना अवाजवी करावी लागत आहे त्यातच रोड वरच चार चाकी सह मोठ्या गाड्या उभ्या राहत असल्याने दूर वरून येणारी गाडी दिसून पडत नाही परिणामी अपघाताचे सत्र थांबता थांबत नसल्याने दिसून येत आहे
हायवे वरून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रोड क्रॉस करावा लागत असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पवनार बस स्थानक चौकात
तत्काळ गति रोधक अथवा पुलाची निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थान कडून जोर धरू लागली आहे.