
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा कोप्रा (खुर्द )येथील शेतकरी असलेले अतुल कुकडे यांचा बैल दिनांक ३०/४/२०२३रविवार रोजी सकाळी वीज पडून ठार झाला.दिनांक ३० तारखेला सकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटा सह पावसाचे प्रमाण होते. उन्हाळा असल्याकारणाने सहसा शेतकरी आपली बैल व दुभती जनावर शेतातच बांधत असतात पण अशा पद्धतीने निसर्गाची अवकृपा होत असले तर शेतकरी हतबल होणार कारण नियमित शेतीच्या कामाला येणारा बैल अचानक
काही क्षणात ठार झाल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संकटाची मालिका शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नाही वेळोवेळी अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकरी पुरता खचून गेला असून अशा पद्धतीने वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटे ओढावत असल्या कारणाने येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी आणखीनच खचून जाईल तसे बघता अनेक शेतकऱ्याजवळ बैलाची संख्या कमी झाली कारण नियमितपणे चारा पाणी करण्यासाठी गुंतून राहावे लागते म्हणून अनेकांनी बैल कमी केले पण काही शेतकऱ्यांनी आपले काम करून इतर आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात मोबदल्याच्या स्वरूपात काम करून थोडीफार आर्थिक चन चन दूर होऊन पावसाळ्यात खर्चाची तजवीज होईल या दृष्टीने बैल ठेवतात पण अशा पद्धतीने जर निसर्गाच्या अवकृपेने बैल ठार झाला तर नक्कीच शेतकऱ्याचे खरिपाचे आखलेले गणित आणि नियोजन बिघडेल तेव्हा प्रशासकीय यंत्रणेने पंचनामा केला असून संबंधित शेतकऱ्याला तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
