
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
केंद्र नेरड अंतर्गत सर्व मुख्याध्यापक शिक्षक, पालक, यांचे उपस्थितीत आपण ज़ि. प. शाळा मधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षक प्राप्त व्हावे या दुष्टी कोनातून सदैव प्रयत्नशील असतो. शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करून आपण दाखल विद्यार्थ्यांना सन्मानित करून दाखल सुद्धा केले आहे. याच प्रमाणे जि प. शाळामधून इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिक्षण पूर्ण करून जाणाऱ्या विद्यार्थीच्या भावना या शैक्षणिक प्रवाहात पदार्पण करण्याच्या वयापासून गुंतलेल्या असतात. शाळेतच पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडणारे हे विद्यार्थी आपले कृपावंतच आहेत त्यांना फुल ना फुलाची पाकळी भेट देऊन सत्कार करण्यात यावा म्हणून नेरडचे केंद्र प्रमुख श्री राजेश खुपसरे सर यांनी संकल्पना मांडत ती पूर्ण करण्याकरीता भेट वस्तू केंद्राअंतर्गत जि. प. शाळामध्ये पोहोचत्या केल्या. या करीता श्री नवनाथ देवतळे सर यांचेही सहकार्य लाभले आहेत आणि केंद्रातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व उपस्थितीत दिनांक 6 मे 2023 आयोजित कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना भेट वस्तू सन्मान पुर्वक प्रदान करून निरोप दिला जाणार.
