राळेगाव पोलीस स्टेशनच्या जमादार यांना 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी कडून रंगेहाथ पकडले,बारा हजाराची लाच घेणे भोवले

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सविस्तर असे की राळेगाव येथील शालिक किशनराव लडके वय 53 वर्षे बक्कल नंबर 1879 नेमणूक शहर पोलीस स्टेशन राळेगाव जिल्हा यवतमाळ हे तक्रारदार यास त्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर कोपरी ते राळेगाव येथे रेतीचे वाहतूक करू देण्यासाठी लाच मागणीचे लेखी तक्रार दिली होती यावरून दिनांक 10/08/2021 रोजी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना त्यांचे ट्रॅक्टर कोपरी ते राळेगाव येथील रीतीचे वाहतूक करण्यासाठी तडजोडही 12000/- रुपये महिना प्रमाणे पंच समक्ष लाचेची मागणी केली व त्यांचा स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक शाली किसन लडके स्वतः लाच रक्कम पोलीस स्टेशन राळेगाव बिट जमादार कक्ष येथे तक्रार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारली यावरून आरोपी यास ताब्यात घेण्यात आले पुढील तपास सुरू आहे, सदर कारवाई श्री विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र व अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, राजेश मुळे पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर नालट अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ व अमलदार सचिन भोयर, राकेश सावसाकडे, किरण खेडकर, वसीम शेख, महेश वाकोडे, राहुल गेडाम, चालक सुधाकर कोकेवार सर्व अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली व शासकीय लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो दूरध्वनी क्र. 07232-244002 तसेच टोल फ्री क्रमांक1064 वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप -अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे