
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 या निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रम या निमित्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राळेगाव व आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक 4 जून रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राळेगाव,
यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना दोन तासीय सहकार व बँक या विषयी प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण उपक्रमामध्ये सहाय्यक निबंधक श्री डेहणकर साहेब, सतीश डोंगरे (श्रेणी1)
सौ वर्षा चौधरी (श्रेणी 2) आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राळेगाव चे मॅनेजर राजेश धोटे, कु. ट्विंकल दोडेवार (डाटा एन्ट्री ऑपरेटर) श्रीकांत म्हैसकर (टेक्निशियन) राहुल राऊत तसेच याकार्यक्रमाचे अध्यक्ष
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुचित बेहेरे संचालक स्वप्निल धर्मे,ज्येष्ठ शिक्षिका सौ मनीषा इखे न्यू इंग्लिश पगारदार कर्मचारी सहकारी संस्थाच्या अध्यक्षा कु.रेखा कुमरे, उपाध्यक्ष विनोद चिरडे, सचिव किशोर उईके हे यावेळी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये सौ.वर्षा चौधरी सहायक निबंधक सहकारी संस्था राळेगाव यांनी सहकार याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली व सहकार कसं चालतं कोणासाठी काम करतं या संदर्भात बरेचसे मार्गदर्शन केले तसेच आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राळेगाव चे मॅनेजर राजेश धोटे यांनी बँक संदर्भात व सहकार विषयी सविस्तर वेळ घेऊन सर्व सखोल बाबतीत सहकाराचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. न्यू इंग्लिश हायस्कूल चे पर्यवेक्षक सुचित बेहेरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजून सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सहकार याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पगारदार संस्थेचे सचिव किशोर उईके यांनी केले.ए या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते…
