
संबंधित प्रशासनाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष.
राळेगावातील प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद मुलांचे प्राथमिक शाळेसमोर अनेक दिवसापासून पाणीच पाणी साचून राहत असल्याने लहान लहान विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यसाठी मात्र मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असून जिकडे तिकडे पाऊसच पाऊस सुरू असताना भर पावसातही शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी लहान लहान चिमुकले रेनकोट, छत्री ,यासारखे पाण्यापासून बचाव करणाऱ्या वस्तू घेऊन येतात पण शाळेला सुट्टी मारत नाही असे असतानाही राळेगाव येथील वडकी हायवे 361 बी लगतचे जिल्हा परिषद शाळेची अवस्था मात्र वेगळीच आहे.
राळेगावातील प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा शाळेमध्ये प्रभाग क्रमांक 14, 15, 16 मधील गरीब, गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच अनेक दिवसापासून पाणी साचत असल्याने याच पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करावा लागतो हे पाण्याचे मोठे डबके अनेक दिवसापासून साचत असून संबंधित प्रशासन मात्र कायमच दुर्लक्ष करीत असून, कोणतीच कारवाई नाही, पाण्यातूनच शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आता दिसत असून संबंध प्रशासनांनी याची योग्य दखल घेण्याची मागणी सर्व पालक वर्ग करीत आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता नवीन वस्ती राळेगाव चा मुख्य रस्ता असून येणारं जाणाऱ्या नागरिकांना ,दुचाकी ना,तसेच पैदल चालणाऱ्या ना या भर रस्त्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते.
