
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )
महागांव, उमरखेड नव्हे तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाविक भगत यांनी हेल्प फाउंडेशन ची स्थापना करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे. महागांव, उमरखेड नव्हे तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर , आरोग्य क्षेत्रात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे. कोणत्याही गावाचा नागरिक असो त्यांना कोणताही रोग असला किंवा अपघात झाला असेल अशा गरजवंत रुग्णाला हेल्प फाऊंडेशन भाविक भगत त्यांच्या नेतृत्वात नेहमीच मदत करायला तत्पर असते लोकांच्या बिमारीत तन -मन -धनाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य देणारे फार दुर्मिळ असतात. त्यापैकी भाविक भगत एक आहेत एरवी लोकांच्या मतदानावर निवडुन आलेले आमदार, खासदार लोकप्रतिनिधी झालेले लोकनेते गोरगरीब सामान्याच्या आरोग्यासाठी व प्रश्नासाठी झटताना सहसा दिसत नाहीत पण भाविक भगत हे मात्र उमरखेड महागांव पासून यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्याही कार्यालयातील जनतेचा कोणताही प्रश्न असो किंवा रुग्णाची कोणतीही समस्या सरकारी दवाखान्यात असो की खाजगी दवाखान्यात असो कोणत्याही रुग्णाची कोणतीही मदत तन -मन -धनाने करतात. हे उमरखेड विधानसभा मतदार संघातील जनतेला व तसेंच यवतमाळ परिसरतील नागरिकांना चांगले ठाऊक आहे.नेता असावा तो असा सदैव मी गोरगरीबांसाठी तत्पर आहे .
मला एक ती एक मुलगी आहे त्यांचे शिक्षक एम. बी. बी. एस. शिक्षण घेत आहे मला त्यांची काळजी नाही मला आता गोरगरीबासाठी सदैव प्रयत्न करत राहील असें त्यांचे शब्द अनमोल हे शब्द ऐकायला मिळाले भाविक भगत बोलत होते .
यावेळी व्हाइस ऑफ मीडिया शाखा उमरखेड चे तालुका अध्यक्ष विश्वास काळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे सचिव सुभाष वाघाडे,, डॉ. आबेजोगाईकर, विलास राठोड, संदीप जाधव राजकुमार शिरगिरे,निकेश राठोड निंगनूर हे उपस्थित होते.
