दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी: राष्ट्रीय महामार्ग ४४ वर अपघाताची मालिका सुरूच

सहसंपादक -रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वर अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच कुठे नाही कुठे किरकोळ किंव्हा गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात त्यामुळे वडकी पोलिसांची कामे वाढली असून राजमार्ग प्राधिकरण ने अपघात प्रणयस्थळ नेहमीचे तेच असल्यामुळे यावर उपाय करायला पाहिजे अशी मागणी सर्वच स्थरावरून होत आहे
एका घटनेमध्ये राष्ट्रीय महामार्ग ४४ वर नागपूर हैद्राबाद महामार्गांवर कारेगाव गावाजवळ आज पहाटे चार ते पाच च्या दरम्यान अपघात झाला असून यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे यामध्ये एच. आर.५५ आर डी ०९९३ हा कंटेनर नादुरुस्त स्थिती मध्ये उभा होता अशातच नागपूर वरून भरधाव वेगाने आयचर क्रमांक एच आर६३ डी ६६२३ ही आली व मागून कंटेनर ला धडक दिली यात आयचर मध्ये असलेले चालक व वाहक गंभीर जखमी झाले असून यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला असून वाहक गंभीर अवस्थेमध्ये उपचार घेत आहे ही घटना पहाटे चार ते पाच दरम्यान ची असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती
दुसऱ्या घटनेमध्ये पिंपरी येथील अक्षय निकम यांच्या मालकीची अर्टिगा गाडी क्रमांक एम एच ३२ वाय ३६७० ही पाढरकवड्या कडून राष्ट्रीय महामार्गाने वडकी कडे येत असताना किन्ही मंगी फाट्याजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून पलटी झाली यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक अभय खिरटकार किरकोळ जखमी झाला आहे.

या महामार्गांवर अपघाताची मालिकाच सुरु
राष्ट्रीय महामार्ग असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो यामध्ये कुठे खडतडं खराब रस्ता तर कुठे व्यवसायिकांनी दुभाजक तोडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून याचा फटका सुरळीत वाहन चालवीणाऱ्यांना बसत आहे पूर्वीसारखेच दुभाजक दुरुस्त व रोडवरीच प्यांचेस बुजविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतात.