बाभुळगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विधी सेवा व्यसनमुक्ती मार्गदर्शन व शपथ

:

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विधी सेवा बाभुळगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे व्यसनमुक्ती मार्गदर्शन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बारटक्के साहेब ,न्यायालय बाभुळगाव, यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. प्रमुख अतिथी अड. गायकवाड सरकारी वकील, व्यसनांची भीती व दुष्परिणाम सांगितले. प्रमुख मार्गदर्शक एड. रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी नशाबंदी मंडळाची कार्यपद्धती व्यसणांपासून सुटका करण्याकरिता उपाय योजना सांगून ,अन्न हवे तंबाखू नको हा संदेश दिला. कार्यक्रमाच्या वेळी अड.आर.आर. रंगारी,योगेश वानोडे ,न्यायालयीन कर्मचारी श्री जयसिंगपूर , श्री दुबे, श्री देठे, अलेक्झांडर मॅडम व तंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विशाल बोरकर यांनी केले.