सर्वोदय विद्यालय रिधोराची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ,10विचा निकाल 93.10%

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली. मार्च 2023मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 93.10%लागला असून 14विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या एकूण 29 विद्यार्थ्यांमधून 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कू.मेघा रुपेश गाऊत्रेप्रथम क्रमांक (८९.६%) कू. कल्याणी अरविंद निंबुलकर दुसरा क्रमांक,,(८२.२,%,) तिसरा क्रमांक साहिल राजेंद्र वाळके (८१.६%) चौथा क्रमांक तनिषा पुरुषोत्तम गुरणुले(८१.२%)तर पाचवा क्रमांक मोहन हनुमान वाटगुळे (८०%)याने प्राप्त केला. शाळेत चालविलेले मोफत अतिरिक्त शिकवणी वर्ग तसेच योग्य अभ्यासपूरक राबविलेले उपक्रम यामुळेच हे शक्य झाले आहे यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या यशाचे संस्थेच्या वतीने श्री पि. व्हि. खिरटकर. आर. डी. पारोधे यांनी कौतुक केले. वरील यशासाठी मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर. सह. शिक्षक वी. एन. लोडे,पि.पि. आसुट कर, आर. एस. वाघमारे, सी. डब्लू.मोडक. तथा शिक्षेकेत्तर कर्मचारी बी. बी. कामडी, वी. टी. दुमोरे,एस.एम. बावणे, एस. वाय . भोयर यांनी परिश्रम घेतले.