खोटे दस्तऐवज दाखल करत विक्री करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

दुय्यम निबंधक कार्यालय राळेगांव येथे खोटे दस्तऐवज दाखल करुन शासकीय अधिकाऱ्यां समोर खोटी बतावणी केल्या मुळे चार इसमां वर
अपराध क्रमांक—261 /2023 कलम 420,468,471 भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे
फिर्यादी रोशन शेषराव पवार वय38 वर्ष प्रभारी दुय्यम निबंधक श्रेणी-1 राळेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन या
आरोपी विरोधात :- 1) राहूल गौतम सोनारखन रा. वाठोडा ता. रा. राळेगाव 2) रेखा राउत रा.वाठोडा ,
3)रंगराव गुलाबराव सुरजूसे रा. मनसावळी ता हिंगणघाट,
4)वासुदेव एकनाथ झाडे रा.मनसावळी ता हिंगणघाट गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
सविस्तर वृत्तांत असा की आज
घटनास्थळ दुय्यम निबंधक श्रेणी-1 राळेगाव येथे
नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 चा भंग केल्यामुळे दुय्यम निबंधक यांचे समकश खोटी बतावणी केली खोटी दस्तऐवज सादर केले.शासकिय अधिका-यासमोर उद्देशपुर्वक खोटी बतावणी केली असून या कार्यालयाची पर्यायाने शासनाची दिशाभुल केली आहे करीता आरोपी नामे 1) राहूल गौतम सोनारखन रा. वाठोडा ता. रा. राळेगाव 2) रेखा राउत रा.वाठोडा ,3)रंगराव गुलाबराव सुरजूसे रा. मनसावळी ता हिंगणघाट,4)वासुदेव एकनाथ झाडे रा.मनसावळी ता हिंगणघाट यांचे विरूद्ध कायदेशिर फिर्याद आहे.वरून पो.स्टे ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.