सेतू मधील सर्व्हरने विद्यार्थी पालकाचे आणि कर्मचाऱ्यांना घाम दाखल्यासाठी हाल : शासकीय विभागाचे दररोज होते जागरण

शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांची मागणी वाढली असताना सर्व्हरच्या मंदगती कारभाराने विद्यार्थी पालक व नागरिक कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
शहरातील सेतू केंद्रातील व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दाखले वेळेत देण्यासाठी अक्षरशा रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागत आहे त्यामुळे तहसील कार्यालयावर सध्या दाखल्यांचा प्रचंड ताण आहे.
नुकत्याच लागलेल्या दहावी बारावीच्या निकालानंतर कार्यालयात विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची सेतू कार्यालयात गर्दी होत आहे.
ऑनलाईन अर्जाची सर्वत्र सोय झाली असली तरी प्रत्यक्षात सर्व्हरच्या मंदगतीमुळे तहसील व सेतू कार्यालयातील कर्मचारी हतबल झाले आहेत तरीही वेळेत दाखले देण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू झाली आहे.
सर्व्हरला दाखल्यांचा ताण सहन होत नसल्याने राज्यभर गोंधळ उडाला आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे सध्या सेतू केंद्रावर राज्यभरातील महाआन लाईनचे पोर्टल मागील तीन दिवसापासून ठप्प झाले आहे यामुळे ऐन नवीन शैक्षणिक क्षेत्राच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
विद्यार्थ्यां उत्पन्नाचा दाखला शिवाय इडब्ल्यू एस, जात प्रमाणपत्र, उ नॉन क्रीमीलेयर, राष्ट्रीयत्व दाखल्यासह इतर प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थी पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
सेतू कर्मचाऱ्यांचे जागरण
तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांना दाखले वेळेत मिळण्याकरिता रात्री बारा ते एक वाजेपर्यंत जागे राहून दाखल्याचे काम मार्गी लावावे लागत आहे.
दररोज २०० दाखल्यांची मागणी राळेगाव तहसील कार्यालयातून दररोज दोनशे दाखल्यासाठी नागरिक तहसील व सेतू कार्यालयात आपले प्रस्ताव दाखल करतात परंतु सर्व्हरडाऊन मुळे विद्यार्थी पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे