
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विशेष प्रासंगिक वृत्त…
लोणी येथील पोलिस पाटील प्रशांत विठ्ठल भोकटे हा अनधिकृत कपाशी बियाणे विक्रेत्यास काल कृषी विभाग व गुन्हे शाखेच्या वतीने माला सहित जेरबंद करण्यात आले, या आधी अंतरगाव येथे एकास याचं कारणानं पकडण्यात आले होते,पण अजून ही काही महाभाग वर्षानूवर्ष हा अवैध अनधिकृत कपाशी बियाणे विक्रेते अजून ही हे बियाणे शेतकऱ्यांना मोठ्या चढ्या दराने विक्री करत आहे..
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व्दारे मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे मौजा लोणी ता. राळेगांव येथे पोलीस पाटील प्रशांत विठठल भोकटे हे भारत सरकाने प्रतिबंधीत केलेले अनधिकृत कापूस बियाण्याची अवैध विक्री करीत असल्याची माहीती मिळाली. त्या अनुषंगाने कर्यवाही करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस व कृषी विभागातील श्री प्रविण जाधव मोहीम अधिकारी, मनिषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगांव, धिरज मोहेकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, निलेश भोयर कृषी अधिकारी पंचायत समिती, कळंब राहूल वंजारी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती, राळेगांव यांचे पथकाने लोणी गावाचे पोलीस पाटील प्रशांत विठठल भोकटे यांचे मौजा लोणी ता. राळेगांव येथील राहाते घराची व घरामागील शेडची झडती घेतली असता शेडमधील कुटारामध्ये रीसर्च हायब्रीड F-1 कॉटन सिडस सिकंदर हायब्रीड बिज नरमा बिज ही नांवे असलेली अनधिकृत कपाशी बियाण्यांची 50 पॉकिटे ताब्यात घेण्यात आली. सदर अनधिकृत कापूस बियाण्यांचे एकूण किंम्मत रू.40000/- असून सदर मुद्देदमाल जप्त करण्यात आला. सदर अनधिकृत कापूस बियाणे त्यांनी प्रदिप ठाकरे रा. अंजनसिंगी ता. धामनगांव जि. अमरावती यांचेकडून प्राप्त केल्याचे सांगीतले. यामुळे प्रशांत विठठल भोकटे रा. लोणी ता. राळेगांव व प्रदिप ठाकरे रा. अंजनसिंगी ता. धामणगांव या दोघांचे विरुध्द पोलीस स्टेशन राळेगांव येथे मनिषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती, राळेगांव यांचे तक्रारी वरून बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही सुनिल बोरकर संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण, प्रमोद लहाळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग, संतोष डाबरे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यवतमाळ, लहूदास आडे कृषी विकास अधिकारी जि.प. यवतमाळ, जगन राठोड उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ व प्रविण जाधव मोहीम अधिकारी जि.प. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात यशस्वी करण्यात आली आहे..
