“सेवा निवृत्त मुख्याध्यापकांनी गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून निरोपीय समारंभात केला आद्य गुरूंचा सत्कार”

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथील मुख्याध्यापक बाबाराव पुंडलीकराव घोडे हे नुकतेच 30 जून 2023 रोजी सेवा निवृत्त झाले, त्यांना शाळेच्या व ग्रामपंचायत येवती च्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन दिनांक 4 जुलै 2023 रोजी शिवकृष्ण मंगल कार्यालय येवती येथे करण्यात आले होते, याच कार्यक्रमात जि प प्राथमिक शाळा, येवती, युवा संगठन येवती तर्फे बाबाराव घोडे आणि त्यांच्या पत्नी सौ ललिता घोडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, दरम्यान सेवा निवृत्त बाबाराव घोडे यांनी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून त्यांना पहिला वर्ग शिकविणारे त्यांचे आद्य गुरु सेवा निवृत्त माजी मुख्याध्यापक निलंकाठराव हुलके आणि शंकरराव उगेमुगे यांचा सत्कार करून गुरु दक्षिणा दिली, या निरोपीय सत्कार समारंभात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साईनाथ भोयर यांनी बाबाराव घोडे यांच्या आईचा सुद्धा सत्कार केला, सदर कार्यक्रमा दरम्यान अध्यक्ष ग्राम पंचायत येवती येथील सरपंच श्रीरामजी सोयाम, प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र गायणर(सेवा निवृत्त उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा माजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती राळेगाव) श्री प्रफुलभाऊ मानकर(कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव),श्री अरविंदभाऊ वाढोणकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री प्रभाकरराव वरूडकर, श्री रितेशभाऊ भरूड, इ मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या,
याच कार्यक्रमा प्रसंगी श्री आनंदराव चौधरी यांनी त्यांची नात कु आराध्या अखिलेश चौधरी हिच्या वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचा वाटप केला, या कार्यक्रमामध्ये श्री राजुभाऊ ठाकरे, श्री श्यामकांतजी येनोरकर, ग्रामपंचायत येवती येथील उपसरपंच श्री आशिष पारधी, ग्रामपंचायत सदस्य , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती येथील शिक्षक वृंद, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्टीत नागरिक, घोडे सर यांच्या सहवासातील परिसरातील शिक्षक वर्ग, केंद्रप्रमुख, मित्र परिवार, आप्तगण तसेच घोडे परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती, सत्कार सोहळ्या नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.