सिलेंडरचा स्फोट होऊन लाखो रुपयाचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातली माता नगर येथील मुधुकर लाभे यांच्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व त्यामुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे घरात ठेवलेली मोटर सायकल व घरातील अन्न धान्य जळून खाक झाले यावेळी घरातील लोक बाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घरात लागलेली आग राळेगाव येथील पोलिस कर्मचारी व माता नगर येथील नागरीक व युवकांनी पुढाकार घेऊन विझवली आहे.