
सहसंपादक : रामभाऊ भोयर
.
राळेगाव चे सुपुत्र युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव शहर व गुजरी येथील जि. प. शाळेच्या विध्यार्थ्यांना नोटबुक, पेन, दीनदर्शिका आदि शैक्षणिक साहित्याचे वाटप (दी.13 जाने.) रोजी करण्यात आले.देशातील 40 युवा उद्योगपती मध्ये 12 व्या क्रमांकाचे उद्योगपती म्हणून हृषीकेश मेंडोले ओळखले जातात. कोणताही बडेजाव न करता शाळेच्या मुलांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाला सर्व स्तरातुन प्रतिसाद मिळतो आहे.
सामाजिक व इतर क्षेत्रात नामवंत मंडळीनी या उपक्रमाला प्रत्यक्षात आणले, साई सेवाश्रम चे सर्व्हेसर्वा युवा सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उर्फ बाळू धुमाळ,शिवसेना उबाठा गटाचे राळेगाव शहर अध्यक्ष इम्रान पठाण,योगेश मलोंडे ,सरपंच प्रसाद ठाकरे,पराग मानकर पत्रकार प्रकाश खुडसंगे, निकेत भलमे अतुल कोवे,युवा नेता तेजस ठाकरे,महादेव लांबाडे आदींनी जि. प. शाळेच्या विध्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना काही अंशी का असेना मदत केली. एक चांगला पायंडा या निमित्ताने पडतो आहे असा आशावाद शिक्षकवृंदाच्या वर्तुळातुन या निमित्ताने उमटू लागला आहे.
राळेगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक महेश सोनेकर यांनी देखील या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.गुजरी येथे मुख्याध्यापक कुणाल सरोदे यांनी या वेळी घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात हृषीकेशभाऊ मेंडोले यांनी या आधी देखील गुजरी शाळेला शैक्षणिक साहित्य व विध्यार्थ्यां स्कुल बॅग दिल्याचा उल्लेख आपल्या मनोगतात व्यक्त केला
