मौजे सारखंनी येथील कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक वाडेकर यांची बदली केल्यास थेट मुख्यमंत्री यांना भेटणार – जिलानी शेख

गटविकास अधिकारी पं स किनवट यांनी बदलीबाबत योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा

मौजे सारखंनी येथील ग्रामपंचायत कार्यरत ग्रामसेवक वाडेकर यांची बदली करून दुसरा ग्रामसेवक मिळण्याबाबत ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्याकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे .आज रोजी कार्यरत असलेले ग्रामसेवक वाडेकर यांचा कार्यालयीन कार्यभार हा उत्तम असल्याचे मत जिलानी शेख यांनी सांगितले आहेग्रामसेवक वाडेकर यांच्या उपस्थितीत
मौजे सारखंनी येथे जल जीवन मिशन सारख्या मोठ्या निधी असलेल्या योजना भ्रष्टाचारमुक्तपणे राबविल्या जात आहे .सदरील योजना उत्तम पणे राबून घेण्यात याव्या या करिता ग्रामसेवक वाडेकर यांना मौजे सारखनी येथे कार्यरत ठेवण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे नागरिकांना आवाहन केले आहे .
ग्रामसेवक वाडेकर यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे सत्तेत असणाऱ्यांना त्रास होत आहे. कोणत्याही निधीचा दुरुपयोग होऊ नये या विचाराने वाडेकर कटाक्षाने काम करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे ना खाणार ना खाऊ देणार अशी भूमिका असलेले ग्रामसेवक वाडेकर हे सत्ताधाऱ्यांना जमत नसल्याचे बोलले जात आहे.

सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक वाडेकर यांची बदली थांबविण्यासाठी थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन संवाद साधणार असल्याचे जिलानी शेख यांनी म्हटले आहे .सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय कीनवट यांनी ग्रामसेवक बदली बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे