मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी मंदर येथे परिवहन समितीची स्थापना

प्रतिनिधी : शरद रामराव तरारे

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी, येथे मान. सीता वाघमारे , वाहतूक पोलिस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली, प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच वर्षाताई बोढे, संस्था सचिव राहुल सुंकुरवार सर तसेच शिक्षण विभाग प्रतिनिधी विनोद नासरे सर, परिवहन समिती सदस्य मोहना वानखेडे, पालक सदस्य सचिन नावडे शाळेचे मुख्याध्यापक मान. अमीन नूराणीसर, वाहतूक पोलिस महेश राठोड उपस्थित होते. सर्वांचे उपस्थीत बस परिवहन समितीची स्थापना करण्यात आली , सर्व मान्यवराचे स्वागत पुष्पगुच्छ व वृक्षस्वर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रत्येक माण्यवराना शाळेकडून वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.सर्व बस चालक व आया/कॅनडेक्टर यांना बसमध्ये शाळेच्या वेळात विद्यार्थी ने – आन करताना वाहक तसेच चालक यांनी त्यांच्या जीवनाची जबाबदारी आपली मुले समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्याशी बोलताना सौजन्य पूर्वक बोलावे, बस चालवीत असताना वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे,,, असे मार्गदर्शन वाहतूक पोलिस अधिकारी वाघमारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचालन शुभांगी देशमुख तर आभार गुडिया पाठक यांनी मानले,सर्व बस चालक तथा आया/ कँडॅक्टर उपस्थित होते.