आता ग्रामस्थांना कळणार, गावात तलाठी कधी येणार,राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेळापत्रक लावण्याचा सूचना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महसूल प्रशासनातील महत्त्वाचा कना म्हणून तलाठ्यांची ओळख आहे शेतकरी ग्रामस्थ यांचा संबंध विविध कामानिमित्त तलाठ्यांसोबत येतो. तलाठ्यांना शोधणे म्हणजे मोठे जीक्रीचे काम आहे. याला आता आळा बसणार आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तलाठी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत व इतर शासकीय इमारतीवर लावण्याच्या सूचना तहसील कार्यालयाने दिल्या आहे.
शैक्षणिक, शेती विषयक तसेच महसुली अभिलेखे ठेवणे, शासकीय वसुली करणे, निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीचे कामे, मतदार याद्या तयार करने, शिधा पत्रिकांची कामे, कृषी गणना, महसुली हिशोब तपासून बंद करणे, थकबाकी खातेदारांची यादी करून पुढील वर्षासाठी थकबाकी मागणी निश्चित करणे, सातबारा गाव नमुना आठ अ अध्यावत करणे, पिक पाहनि बिनचूक आणि वेळेवर करने त्यानुसार अहवाल वरिष्ठाना विनाविलंब सादर करणे, हंगामात होणारे बदल व पिकांची स्थिती याचा अहवाल तहसीलदाराकडे पाठवून त्याची एक प्रत मंडळ निरीक्षकाकडे पाठवणे आवश्यक असते अशी कामे तलाठ्यांना करावी लागतात. तलाठ्याच्या कार्यक्षेत्राला साजा म्हणतात. सामान्यतः एक ते चार गावांचा मिळून तलाठी साजा असतो.
या गावातील विविध कामे तलाठ्याला करावे लागतात विविध कामे करताना अतिरिक्त भार पडतो त्यामुळे प्रत्येक गावात तलाठी वेळेवर उपस्थित राहू शकत नाही ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालय व अन्य शासकीय इमारतीवर उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक लावण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत मात्र तलाठी या सूचनांचे पालन करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी घ्या दक्षता : तहसीलदार भोईटे


तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठका, कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रा.पं. च्या दर्शनी भागात दिसेल अशा पद्धतीने सूचना फलकावर आगाऊ वेळेत लावावे. तलाठ्यांनी साजा कार्यालयीन ठिकाणी उपस्थिती बाबत वेळापत्रक निश्चित करून सदर वेळापत्रक संबंधीत गावच्या ग्रा.पं. च्या दर्शनी भागात लावावे सदर वेळापत्रक मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना पाठवावे. तलाठ्याने त्यांचा दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक कार्यालयात लावावा नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे बाबतच्या सूचना केल्या आहेत. अशी माहिती तहसीलदार अमित भोईटे यांनी दिली.