साई पॉलीटेक्निक किन्ही जवादे येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दि 11 ऑगष्ट रोजी राळेगाव तालुक्यातील किन्ही ज येथे साई पॉलिटेक्निक कॉलेज वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराला राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रा,डॉ अशोकरावजी उईके,पं, समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे,जी,प सदश्य चिंतरंजनदादा कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवून भेट दिली,या शिबिराला अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले,ह्यावेळी जी,प सदश्या सौ प्रितीताई काकडे,सौ विद्याताई लाड,किन्ही गावच्या माजी सरपंच सौ नम्रताताई काकडे,सामाजिक कार्यकर्ते संजयजी काकडे,अनिलराव नंदूरकर,विनोदभाऊ मांडवकर,चंद्रशेखरभाऊ महाजन,कैलासजी ठाकरे,गजाननराव लढी,सह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.