यवतमाळ जिल्हा काँग्रेस व राष्ट्रीय ओबीसी महासंघ देणार जिल्हाधिकारी यांना निवेदन, मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीमध्ये नको : अरविंद वाढोणकर

यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व यवतमाळ जिल्हा ओबीसी महासंघ यांच्या वतीने मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी मध्ये द्यायचे नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. अगोदरच ओबीसीमध्ये असंख्य जाती आहे.जिल्ह्यामध्ये अजूनही नगण्य आरक्षण ओबीसींना मिळत असून त्यातही भरीत भर सरकार सरकार मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करीत असल्याने ओबीसीमधील सर्व घटकांनी ताकदीने संघर्ष करण्याची गरज असल्यांने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना अशा आशयाचे निवेदन द्यायचे असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ओबीसी घटकांनी अकरा वाजता यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे उपसभापती अरविंद वाढोणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.