
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १५ गणेश मंडळ होते. गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, गणेश मंडपात दहा दिवस उठणे ,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय, डेकोरेशन,सजावट, पुज्या, आरती विविध कार्यक्रम, उत्सवाचे दिवस कुणीकडे गेले कळलेच नाही.आणि श्रावण महिन्यात अनेक सण पार पडल्यानंतर लगेचच गणेशोत्सव येतो. आणि कधी दहा दिवस निघून गेले माहित सुद्धा झाले नाही अर्थातच गणरायाला निरोप देण्याची वेळ होती. आज त्या मंडपातली गणरायाची शेवटची आरती झाली अन् डोळे पाणावले आरती संपली , गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते व या कंठ दाटलेल्या आवाजात गणेश भक्ताचा आवाज निघत होता.पूजा आरती झाल्यानंतर वाजत गाजत ,ढोल ताश्याच्या आवाजात सर्व गणेशमंडळ आठवडी बाजार येथे जमले ,तिथून शहरातील मुख्य मिरवणुक मार्गाने मिरवणुक सुरू झाली. काही वर्षांपूर्वी महामारीच्याकाळात कोणतेही उत्सव, मिरवणुक बंधने पाळूनच करावी लागली मात्र यावेळी किचकट अशी बंधने नसल्यामुळे गणरायाच्या भक्तात उत्साह पहावयास मिळाला. निसर्गराजा ने सुद्धा यावेळी उघडीक दिली होती त्यामुळे भक्त धूमधडाक्यात आपआपल्या मंडळा पुढे ढोल ताशे, डिजे,यांच्या तालात आनंदाने नाचत होते. मिरवणुकीत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी खबरदारी मनून चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता,तसेच सर्व गणेश मंडळांनी याची खबरदारी घेतलेली दिसून आली. माता भगिनींनी मुख्य मार्गावरून गणरायाची मिरवणूक जात असताना स्वागतासाठी अतिशय सुंदर रांगोळ्या काढून गणराया प्रती आपली भक्तीयुक्त श्रद्धा प्रगट केली तसेच गणेशभक्तांना अनेक दात्यांनी अल्पउपहार व थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. शहरातील नेतेमंडळी ,समाजसेवक,शांतता कमिटी सदस्य,पत्रकार संघ,वरिष्ठ मंडळी ,पोलिस प्रशासन, विद्युत वितरण कंपनीचे तसेच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यावेळी मोलांची कामगिरी बजावत अतिशय शांततेत मिरवणुक पार पडावी यासाठी मोलाचे सहकार्य केले यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक विनायक कोते यांची उपस्थिती होती व बीटरगाव(बु) पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुजाता बन्सोड,उपनिरीक्षक शिवाजी टीपूर्णे,व संपूर्ण पोलिस प्रशासनाने यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे संपूर्ण गणेश मंडळ व शहरातील लोकांनकडून अधिक उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.अशा प्रकारे अतिशय शांततेत मिरवणुक पार पडली. गणरायाचे विसर्जन गांजेगाव येथील पैनगंगा नदीत करण्यात आले
