शेतकऱ्यांनो ढाणकी शहरात माल विकायला आणत आहात तर शेतकऱ्यांना कट्टी काटा धारा व नियम मान्य करावा लागेल


ढाणकी
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी


ढाणकी हे आजूबाजूच्या गाव खेड्यासाठी सर्वात मोठी व्यापार पेठ मानल्या जाते कृषी संसाधन आणि बँकेचे व्यवहार या सर्वच बाबीसाठी शेतकऱ्यांना ढाणकी ही मोठी व्यापार पेठ आहे. म्हणून अनेक गाव खेड्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात पण ढाणकी शहरातील शेतकऱ्याचे मुस्कटदाबी धोरण अवलंबून शेतकऱ्याचा माल खरेदी केल्या जात आहे आधीच निसर्गाच्या अवकृपेची साथ काही शेतकऱ्यांपासून दूर जायला तयार नाही त्यातच भुसार व्यापारी कट्टी काटा वर धारा अशा इंग्रज कालीन पद्धतीचे लुटीचे धोरण अवलंबून आपले उखळ पांढरे करतांना दिसत आहे तेव्हा हा अन्याय कुठेतरी थांबायला पाहिजे अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याच्या दारात आला म्हणजे तेथील काम करणारी यंत्रणा प्रामाणिकपणाचा आव आणत शेतकऱ्यांनी आणलेल्या पोत्यातीलमधील माल बंब्याद्वारे नमुन्याच्या स्वरूपात दोन किलो माल काढल्या जातो ते पण परत मिळत नाही विशेष. तसेच अनेक ठिकाणी माल विकल्यानंतर जणू किराणा दुकानात माल खरेदी केला जातो तशा प्रकारची एक चिठ्ठी दिली जाते अशावेळी शेतकऱ्यांची फसगत सुद्धा होऊ शकते व अनेक ठिकाणी फसवणूकीचे प्रकार झाल्याचे ऐकिवात आहे. तसेच शेतकऱ्यांचा माल आला म्हणजे सर्व स्तरातून” उठा रे लुटारे अमृताचे कुंड” असाच प्रत्यय येतो आहे व धनी दिलगीर चोरटे खुशाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

         

नायलॉन पोते हे १२५ ग्रॅम भरत असताना त्याचे वजन ५०० ग्रॅम शेतकऱ्या जवळून घेतल्या जाते एखाद्या शेतकऱ्याने महाग असलेला व उच्च प्रतीचे सोयाबीन विकायला आणले असता उदाहरणार्थ ५० क्विंटल माल दिला असल्यास एका पोत्याच्या मागे अशा वजन लुटीचे धोरण अवलंबल्यास सबंधीत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान होऊन कुठेतरी शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच फारी बारदाना हा ७०० ग्रॅम भरत असताना तो १५०० घेतल्या जाते तसेच माल विकत असताना एक किलोच्या आतील मालाचे वजन मापात धरल्या जात नाही हा कोणता व कसला नियम व धारा आहे व कोण्या राजकीय व्यक्तीसाठी आहे हे कळायला मार्ग नाही याबाबत एखाद्या सुज्ञ नागरिकांनी किंवा शेतकऱ्याने विचारण्या केल्या असल्यास त्याचा अपमान केला जातो व अधिक चौकशी केली असता आहे ते असे आहे माल घ्यायचा असेल तर आमच्या नियमाने तुम्हाला वागावे लागेल व आमच्या अटी शर्ती मान्य असेल तरच आम्ही तुमचा माल घेऊ अन्यथा माल परत घेऊन जा अशा पद्धतीचे मुजरीचे व मुस्कटदाबीचे धोरण अवलंबल्या जात आहे. तसेच तुम्ही माल द्यायला आमच्याकडे आले आम्ही काय तुम्हाला माल घेऊन येण्याचे आमंत्रण दिले नव्हते अशी अपमानास्पद वागणूक दिली जाते शिवाय मापात पाप असते. वजन काटा तपासणारी यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून ढाणकी शहरात फिरकली सुद्धा नाही त्यामुळे इथे एक प्रश्न पडतो की शेतकऱ्यांची हित जोपासणारे शासन आणि प्रशासन यांची बघ्याची भूमिका का? अवलंबत आहे हा एक चिंतनाचा विषय बनतो ज्यावेळेस इंग्रजी जुलमी राजवट होती त्यावेळी सर्व पक्ष शक्तीनिशी अन्यायाविरोधात आंदोलने करत होती व जनतेला अन्यायापासून दूर करत होती पण ढाणकी शहरात अशी शेतकऱ्याची लूट होत असताना राजकीय नेते तथास्तुच्या भूमिकेत का किंवा व्यापाऱ्याच्या पदरात सर्व राजकीय पद मिळाल्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी अशी भूमिका सुद्धा राजकीय नेत्यांची दिसते तसेच मालाची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात होते ??अशा काही बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शेतकऱ्यावर होणार अन्याय दूर करावा असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे