२१ वर्षीय युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या वडकी येथील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एका २१ वर्षीय युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली
स्वप्निल वासुदेव खंडाळकर वय २१ वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे,
स्वप्निल ने दि ३० डिसेंबर रोजी रात्री दरम्यान गावातील पिंपळापूर रोडलगत असलेल्या विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले.
मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
स्वप्निल हा त्याची आई सिताबाईला एकुलता एक मुलगा होता,स्वप्निल १५ वर्षाचा असतानाच वडिलाचे छत्र हरविले, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याने शिक्षणाला पूर्णविराम दिला व गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा.त्याचे पश्चात आई सीताबाई व एक मोठी बहीण सुप्रिया ती आपल्या सासरी नांदत आहे,त्याची आई सिताबाईला स्वप्निल हा एकुलता एक मुलगा होता मात्र
गेल्या काही दिवसांपासून त्याला दारू पिण्याचे व्यसन जडले होते,तो दारूच्या आहारी गेल्याने त्याचा त्रास वाढला होता याच त्रासापासून त्याची आई माहेरी आपल्या आईकडे रहायला गेली.तो आई विना एकटा जीवन जगत होता,नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे गावात बोलले जात आहे काल रात्री ९ च्या दरम्यान स्वप्नीलने गावालगत असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली,घटनेचे माहिती ठाणेदार विजय महाले यांना कळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले व मृतकाला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र रात्रपाळीत त्याला विहिरीतून बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर आज रविवारला सकाळच्या दरम्यान ठाणेदार विजय महाले यांनी घटनास्थळ घाठले, व मृतकाला बाहेर काढणे कठीण असल्याचे पाहून ठाणेदार विजय महाले यांनी मदतीचे पाऊल उचलत स्वतः विहिरीत उतरले व मोठ्या शिताफीने मृतकाला बाहेर काढले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाला पुढील उपचारासाठी राळेगाव येथे हलविण्यात आले.या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रशांत जाधव,बीट जमादार संदीप मडावी,विलास जाधव,किरण दासरवार,निलेश वाढई,रमेश मेश्राम हे करीत आहे.