
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील असलेल्या पोलीसदादांच्या वसाहतीतील गैरसोयीमुळे आता पोलीस दादाच हैराण झाले आहे. शहरातील असलेली पोलिसांची निवास ही अनेक वर्षापूर्वीची आहेत ही बहुतेक निवासस्थाने अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात या निवासांना गळती लागत असून या गैरसोयीमुळे आता पोलीस दादाच हैरान झाला असून पोलीस दादा ड्युटीवर आणि वहिनी गळक्या घरात राहत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अहोरात्र कर्तव्य बजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी हक्काचे घर मिळत नसल्यामुळे बदलीनंतर नवीन ठिकाणी रुजू होण्याआधी त्यांना प्रथम घर शोधण्याची आणि अडचणी सोडवण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.
शहरात पोलिसांकरीता एकूण १६ निवासस्थाने आहेत त्यापैकी १५ निवासस्थाने पोलीस दादांसाठी तर एक अधिकाऱ्यांसाठी असे एकूण १६ निवासस्थाने असून १५ निवासस्थानापैकी ८ निवासात पोलीस दादा व त्यांचे कुटुंब राहतात तर एक अधिकारी यांच्या साठी असलेल्या निवासात अधिकारी राहतात परंतु अधिकाऱ्यांच्याही निवसाला पावसाळ्यात गळती लागत असल्याने या अधिकाऱ्यांच्या निवासालाही ताडपत्रीचा आधार दिसून येत आहे.
या जीर्ण झालेल्या निवासाला पावसाळ्यात छताला गळती,भिंती उखडणे, तुटलेल्या दारे- खिडक्या , अस्वच्छ स्वच्छतागृहे तुंबलेली गटारे अशा प्रकारे जीर्ण झाले आहेत त्यातच संरक्षण भिंती नाही तसेच निवासाच्या परिसरात अस्वच्छते मुळे आरोग्यावर परिणाम होत असताना सुद्धा पोलीस दादांना आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून राहावे लागत आहे तेव्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व नवीन निवासस्थाने बांधून देण्यात यावे अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
राळेगाव पोलीस ठाण्याला एकूण ३२ कर्मचारी पदे मंजूर आहेत त्यापैकी ८ पदे रिक्त आहे तर २१ कर्मचारी व ३ अधिकारी कार्यरत आहेत. ३ अधिकारी व २१ कर्मचाऱ्यांवर तालुक्यातील ६२ गावांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामळे प्रशासनाने रिक्त पदे भरावीत अशी मागणी सर्वत्र होत आहे
अपुरी निवासस्थाने व जीर्ण
सध्या उपलब्ध असलेली पोलीस निवासस्थाने कर्मचारी संख्येच्या तुलनेत अपुरी आहेत परिणामी अनेक पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात किरायाने घर घेऊन राहतात
