
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक १२ जानेवारी ला राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.पी.सामृतवार व प्रमुख अतिथी अजय नरडवार सर मंचावर उपस्थित होते.. पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून व प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली… विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली… मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ ची वेशभूषा केली होती ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी मुजबैले या विद्यार्थिनी ने केले. कार्यक्रमाचे नियोजन एंबडवार सर यांनी केले..या उपक्रमात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
