खरेदी विक्री संघाच्या राळेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला ISO प्रमाणपत्र

सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या गोंडपुरा येथील स्वस्त धान्य दुकानाची ग्राहकांना व्यवस्थीत मिळणारी सेवा, ग्राहकांशी मानसन्मानाची वागणूक या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने आय एस ओ प्रमाणपत्र खरेदी विक्री संघाला दिले हे प्रमाणपत्र कर्मचारी गणेश हिवरकर यांना राळेगाव विधानसभा संघाचे आमदार डॉ अशोक ऊईके यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.त्यावेळी राळेगाव उपविभागीय अधिकारी पाटील साहेब, तहसिलदार अमित भोईटे, नायब तहसीलदार भेंडे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव हे हजर होते.या वेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष मारोतराव पाल, संचालक अशोक काचोळे,श्रावनसिंग वडते, पंकज गावंडे,पवन छोरीया,श्रीधर थुटुरकार, कवडू कांबळे, दिनेश ठाकरे, विनोद भोकटे, सचिन टोंग वर्षा बोरकर, राजश्री झोटींग , संदीप तेलंगे अभिजित मानकर, प्रशांत बहाळे, बंडू धुळे, जितू कहुरके तसेच संस्थेचे सचिव संजम जुमडे,, कर्मचारी सचिन बोरकर, अवधूत शेराम, रोशन शिवरकर यांनी अभिनंदन केले आहे.