
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्याने शेतात ज्वारी लावली ज्वारीचे पीक चांगले आले सुद्धा पण आता ज्वारीला कंस लगडले असताना ती खाली तुटून पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कंस खाली पडत असल्याने ज्वारीच्या पिकाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून तर घेतला जाणार नाही याची चिंता शेतकऱ्याला लागली आहेत शहरातील सुरज गुणवंतराव काळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात हायटेक या कंपनीचे उन्हाळी ज्वारीचे वाण लावले या पिकाला व्यवस्थित पाणी दिल्या जात होते खत दिल्या जात होते तसेच फवारणी केल्या जात होते अडीच महिन्यानंतर ज्वारी निसवली व ज्वारीच्या कंसात दाणे पडण्यास सुरुवात झाली या काळात ज्वारीचे धांडे जमिनीपासून दीड ते दोन फुटापासून आपोआप मोडत आहे दांडा मोडल्यामुळे हा धांडा पूर्ण वाळत आहे यासंदर्भात हायटेक कंपनीच्या साहेबांना शेतात पाहणी करता बोलावले असता उडवा उडवीची उत्तरे दिले तरी याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन सुरज गुणवंतराव काळे तसेच त्याची आई उषा गुणवंतराव काळे या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे दिले आहे संबंधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुरज काळे व त्याच्या आईने कंपनीकडे केली आहे प्रतिक्रिया विजय धांडे तालुका कृषी अधिकारी राळेगाव मी काळे यांच्या शेतात पिक पाहण्याकरता गेलो पिक वाचवण्यासाठी काय करता येईल याविषयी मी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी सुद्धा बोललो चौकशी चालू आहेत चौकशी केल्यानंतर काय करता येईल हे ठरवले जाईल.
