
उन्हाचा कडाका पिकांच्या मुळावर;पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड –
पावसाने मारली दडी, कोरडवाहू वर दुबार पेरणीचे संकट
तुषार सिंचनावर पिकांची भिस्त
तालुक्यात जरी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी ईसापुर फुलसावंगी हा परिसरात एकच केवळ अर्धा तास दमदार तर रिमझिमचं पाऊस पडला आहे. या अपुऱ्या पावसावरचं शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. आता पावसाने मागील तीन दिवसा पासून दडी मारली आहे, आणि सूर्य आग ओकत असल्याने अंकुरणारे पिके धोक्यात सापडली आहे.कडक्याचा ऊन जणू पिकांच्या मुळावर उठला आहे.
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक बाजू बळकट करणारा हंगाम असतो, या हंगमावर शेतकऱ्यांचे वर्षभराची आर्थिक देवाण – घेवाण अवलंबून असतो. त्याच शेती ला व्यवसाय अतिशय जोखमीचा झाला आहे. शोकांतिका म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणून आपण ज्यांचा प्रति गौरवउदगार काढतो त्या शेतकऱ्यांला दर वर्षीचं पीक कर्ज काढल्या शिवाय तो बियांना सुद्धा घेऊ शकत नाही. मागील दहा पंधरा वर्षाचा कालावधी पाहता शेतकरी केवळ विविध बँका, संस्था, सोसायट्याचा फक्त कर्जदार बनून राहिला आहे.निसर्गाच्या कचाट्यातून पिके वाचलीच तर बाजार भाव लागत इतका तरी मिळेल याची शास्वती नाही. शेती हा ऐकमेव व्यवसाय आहे ज्याचे दर (व्यापरी ) निश्चित करतात.तरी शेतकरी हा जिकरीच्या व्यवसायात सतत धडपडत आहे.
या वर्षी पावसाचा अंदाज चांगला असला तरी ईसापुर फुलसावंगी परिसरात पावसाची महागाव तालुक्यात इतर ठिकाणी पडणाऱ्या पावसा इतकी सरासरी नाही. फुलसवंगीत एक दमदार पाऊस तो ही केवळ तास भर व रिमझिम पावसाने हजेरी लावलेली आहे. या ओलाव्या वरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. रिमझिम पावसामुळे पिके कसेबसे जमिनी बाहेर डोकावू लागले असतांना पावसाने मागील तीन दिवसा पासून खंड दिला आहे.व उन्हाचा पारा देखील वाढला आहे. उन्हाळ्या सारखा सूर्य आग ओकू लागल्याने अंकुरीत होतं असलेले पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. पावसाने अशीच उसंती अजून दोन तीन दिवस दिल्यास परिसरातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर दुबार पेरणी चा संकट ओडूउ शकतो. तर ज्यांच्या कडे पाण्याची व्यवस्था आहे अश्या शेतकऱ्यांना च्या पिकांची भिस्त केवळ तुषार सिंचनावर येऊन ठेपली आहे.
दुबार पेरणी शिवाय पर्याय नाही –
पावसाने मोठी उसंती दिली आहे. उन्हाने पिके करपण्याच्या मार्गांवर आहेत. या दोन तीन दिवसात पाऊस नाही आला तर दुबार पेरणी शिवाय पर्याय नसेल.
उत्तम जाधव
शेतकरी पिंपळवाडी
