
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव – सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकीच्या वतीने राष्ट्रीय कारगिल दिवस विविध उपक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्थानी प्राचार्य सचिन ठमके हे होते. तर प्रमुख अतिथी संस्थाध्यक्ष रणधीरसिंह दुहान होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी रणधीरसिंह दूहान यांनी कारगिल युद्ध कधी, केंव्हा व कसे लढले गेले? या विषयावर उपस्थित विध्यार्थ्यांना सविस्तर विवीध इतिहासिक दाखले व उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
दरम्यान, या दिनाप्रसंगी कारगिल युध्दात शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ विध्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिन ठमके यांनी केले. तर जितेंद्र यादव यानी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
