
वडकी ठाणेदाराची उत्तम कामगिरी
सहसंपादक: रामभाऊ भोयर
कत्तलीसाठी जनावरांची तस्करी विरुद्ध वडकी पोलिसांनी कारवाई करत १४ बैलाची तस्करांकडून सुटका केली.
पोलिसांनी तस्करी करणारा कंटेनर जप्त करुन चालकासह एकाला अटक केली आहे.मनीष ब्रिजमोहन नागपाल (३८) रा.नागपूर,इसराईल कुरेशी अब्दुल शेख रहीम (३५) रा,नागपूर असे अटक करण्यात आलेल्या जनावर तस्करांचे नाव आहे. वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांना जनावरांची तस्करी बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक ४४ वर देवधरी घाटात नाकाबंदी केली.
बुधवार दि 31 जुलै रोजी रात्री ११ च्या दरम्यान नागपूर कडून हैद्राबादकडे जाणाऱ्या एम एच ४० वाय ८९०५ क्रमांकाच्या कंटेनरला पोलिसांनी थांबविले. त्यात १४ बैल हे अत्यंत निर्दयीपणे आखूड दोरीने गळ्याला फास लावून बांधलेले दिसले.पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावर कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुली वरुन पोलिसांनी कंटेनर मधील १४ नग बैल प्रत्येकी २० हजार प्रमाणे एकूण २ लाख ८० हजार रु, तसेच कंटेनर किंमत २५ लाख असे एकूण २७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची ही कारवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरकडे,सचिन नेवारे,किरण दासरवार,अविनाश चिकराम,यांनी पार पडली.
