
..
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संजय काळे हे नेहमीच सकाळी लवकर उठून शेतात जायचे नेहमी प्रमाणे सकाळी उठून आपल्या शेतामध्ये गाईचे दूध काढण्या करिता गेले असता
त्यांना त्यांची काही जनावर मोकाट दिसले व त्यांना पाहून त्यांच्या जवळ आले. नंतर त्यांचे लक्ष शेतातील जाणवरंचा गोठया कडे गेले असता हा जळलेल्या अवस्तेत दिसला. जवळ जाऊन बघताच त्यातील संपूर्ण शेती मशागतिचे अवजार कुटार व त्यातील दुधाळ जाणवरे तीन गाई मृत अवस्तेत पडून दिसल्या तसेच दोन बैल, एक कालवड, व एक मैस ला आगी मुळे बऱ्या पैकी मार लागलेला आहे.गंभीर जखमी अवस्तेत आढळले. त्यानंतर त्यांनी लगेच पांढरकवडा पोलिस्टेशनं ला या संपूर्ण घटनेची माहिती टेलिफोन द्वारे दिल्ली, तरी या माहितीच्या आधारावर पांढरकवडा पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पोचून पाहणी करण्यात आली तसेच पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.झांबरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
