
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
सामाजिक संस्कृती ची पंरपरा जपतं, भाऊबीज एक जिव्हाळ्याचे नाते आठवणी त असावे यासाठी ग्राम स्वराज्य महामंच दरवर्षी “‘ विधवा महिलांसाठी साडी चोळी “‘ कार्यक्रम घेतल्या जातोय आणि विचारमंथन आणि समुपदेशन केले जाते या निमित्ताने साडी चोळी कार्यक्रमाचे नियोजन मा.मधुसुदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या नेतृत्वाखाली केले जाते या साडी चोळी कार्यक्रमाचे त्याग मुर्ती व्यक्ती म्हणून श्रीमती आशाताई काळे उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कृष्णा जी भोंगाडे आणि सहभागी पाहुणे इंजिनिअर प्रतिभा पवार, अध्यक्ष प्रतिभा फाउंडेशन,मा रमेशजी घोसले शिवमंदिर (महादेवाचा खोसा) चे सदस्य उपस्थित होते, कार्यक्रमाच्या निमित्ताने,१) विधवा महिला च्या समस्या, २)महिला सक्षमीकरणासाठी महिला संघटना ची आवश्यकता ३) विधवा महिलांसाठी एक विशेष योजना निर्माण करणं शासन दरबारी प्रस्ताव पत्रिका तयार करण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच पुढाकार घेईल असे मान्यवरांनी आपले मत या कार्यक्रमात व्यक्त केले.* *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले २० विधवा महिलांसाठी साडी चोळी देवुन समुपदेशन करण्यात आले आणि अनेक जेष्ठ नागरिक मंडळी सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने श्रीराम राड्री,पाडसे गुरुजी, चंद्रशेखर ताम्हणे, चारुदत्त नेरकर, दिलिप सिंह (गौतम)ठाकुर विश्वास कुंभेकर, इश्यू माळवे दिलिप ऊईके,मंगाम, नितीन ठाकरे प्रल्हाद काळे, सपना कोळसे,पपिता माळवे मंगला टेकाम वैशाली पडसोडे सुनिता तोमर कलावती उईके, ताराबाई कोटणाके ज्योती ढाले आणि महिला पुरुष जेष्ठ नागरिक मंडळी या साडी चोळी कार्यक्रमात सहभागी होते.
