ढाणकी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे तरुण धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी रवाना

.
प्रतिनिधी प्रवीण जोशी.
ढाणकी.


दिनांक ६ ला ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराजवळ धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी तरुण जमले होते. ही मोहीम एकूण पाच दिवसासाची असून नरवीर श्री तानाजीराव मालसुरे समाधी उमरठे श्री शिवछत्रपती समाधी रायगड मार्गे श्री नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधी असा प्रवास होणार आहे. असे प्रतिपादन यावेळी तरुणांनी केले . एकूण ६ दिवसाची ही मोहीम असून शहरातून मोठ्या संख्येने तरुणांचा जथा या प्रवासाला रवाना झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत स्वराज्य निर्मिती केली त्या पावन भूमीत वास्तव्य केले व महाराजांनी अभेद्य इतिहास रचला तो समजून घेणे हा यामागील उद्देश ठेवून या तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तरुणांना सुज्ञ व सुजान बनवून समाज घडवायचा असल्यास श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री धर्मवीर संभाजी महाराज या मंत्राशिवाय दुसरा मंत्र असू शकत नाही. हजारो तरुणांना एका आवाजासरशी एका जागी आणणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी आवाहन केले व तरुण कधी आले नाही असे कधी झाले नाही याआधी सुद्धा ३२ मण सोन्याचे राज सिंहासन बनविण्याची मोहीम सुद्धा भिडे गुरुजी यांनी राबविली आहे.तसेच भिडे गुरुजी म्हणजे शिवप्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान म्हणजेच भिडे गुरुजी त्यामुळे भिडे गुरुजींच्या कार्याचे मूल्यमापन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातूनच करावे लागेल व एकाच नाण्याच्या दोन बाजू होय. विशेष बाब म्हणजे विज्ञानाचे पाईक असलेले व उच्च विद्या विभूषित संभाजी भिडे गुरुजी हे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जमिनीला आपले आराध्य म्हणून पायात कोणत्याही प्रकारचे पादत्राणे न घालता अनवाणी निर्वाणी प्रवास करतात हे विशेष बाब. नक्कीच छत्रपतींना होऊन अनेक शतकांचा कालावधी होऊन गेला पण आज सुद्धा तरुणांना महाराजांविषयी प्रचंड आकर्षण आहे. ते कधीच न संपणारे आहे हे विशेष. जिथे जिथे हिंदवी स्वराज्याचा हुंकार आणि आक्रोश आहे तिथे तिथे अशरीर रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व आहे. या तरुणांनी पांढऱ्या टोप्या घालून जगात शांतता व समभावनां नांदून सर्वांची प्रगती व्हावी असा संदेश नक्कीच दिला असावा. व यावेळी तरुणांना रवाना करताना गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा व माता भगिनींचा सहभाग दिसून आला तसेच गावातील सामाजिक दायित्व नेहमीच जपणाऱ्या व्यक्तींनी या तरुणांना दीर्घकाळ टिकणाऱ्या पदार्थांचा जिन्नसाचे वाटप करून आपले दायित्व जपले तसे बघितले असता तरुण अनेक अत्याधुनिक खेळामध्ये व्यस्त असताना छत्रपतींच्या भूमीमध्ये जाताना युवकांमध्ये प्रचंड जल्लोष ओसंडून वाहत होता.