सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव महिलेचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील लखापुर रावेरी शेत शिवारात उघडकीस आली.
अंजना शंकरराव भोयर वय ६५ वर्ष रा.नविनवस्ती राळेगाव असे विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या वेडसर महिलेचे नाव आहे.
मृतक अंजना भोयर ही डोक्याने वेडसर असल्याचे कारणाने घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.दरम्यान आज मंगळवार रोजी लखापुर रावेरी शेतशेवारात गावातील मजुरांना एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने ही माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली. नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतक महिलेची ओळख पटवून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शववीच्छेदनाकरिता राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
सदर मृतक महिला अंजना भोयर हिला वेडसरपणा असल्याने तिने विहिरीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली असावी त्यामुळे कोणावरही काही संशय नसल्याची फिर्याद विनायक शामराव गावंडे रा,राळेगाव यांनी राळेगाव पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.
