
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या महोत्सवातील भाऊबीजेच्या शुभदिनी जय लक्ष्माई माता क्रीडा मंडळ जळकादेवी ता. राळेगाव, जि. यवतमाळ यांच्या वतीने एक दिवसीय खुले कबड्डी सामने – एक गाव एक संघ या संकल्पनेतून भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे शहरप्रमुख डॉ. कुणाल भोयर हे लाभले. तर उद्घाटक म्हणून लखमाई माता देवस्थान जळक्याचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश गहरवाल तसेच गुरुदासजी नगराळे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्रामपंचायत उपसरपंच विजय धानोरकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जगदीश ठाकरे सर, तसेच जळका ग्रामपंचायत सदस्य निलेश हिवरकर आणि हेही या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक माणिकराव बडे, भंदाजी लोणारे, अशोकराव येडसकर, गजाननराव कुठे, रमेशराव पांडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी तालुक्यातील कबड्डी हंगामातील पहिली स्पर्धा याच मंडळाकडून केली जाते. एक गाव एक संघ या नियमात जवळपास 100 संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदवतात. कोणताही अनुचित प्रकार न घडू देता सामने कौशल्यपूर्ण रितीने पार पाडले जातात. पेसा क्षेत्रातील हे गाव कबड्डी खेळाच्या बाबतीत तालुक्यात अग्रेसर मानले जाते.
उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. कुणाल भोयर यांनी मंडळाचे व सर्व सदस्यांचे कौतुक करताना म्हटले की, “कबड्डी खेळामुळे गावात एकजूट निर्माण होते. विविध जाती-धर्मातील लोक एकत्र येऊन आपल्या गुणांचे प्रदर्शन करतात. कबड्डी हा आपल्या मातीचा खेळ असून आज त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. जीवनात कधीही हार मानू नये, ऑल आऊट झाल्यानंतरही पुन्हा ऑल इन होण्याची संधी असते हे कबड्डी शिकवते,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडसकर गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सर्वेसर्वा सायसे यांनी केले.
